अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संसर्गामुळे देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली, यामुळे अनेक कंपन्या, उद्योग, व्यवसाय बंद पडले. बेरोजगारांमध्ये आणखी भर पडली, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी पक्षाने रोजगारच्या नव्या संधी उपलब्ध करण्यासाठी 50 टक्के सवलतीमध्ये उपलब्ध केलेल्या पिठ गिरण्यांमुळे महिलांना उपजिविकेचे साधन झाले, असे प्रतिपादन सीमा सुनिल त्र्यंबके यांनी केले.
नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पुढाकार घेऊन बेरोजगार महिला व तरुणांना उद्योग व्यवसायात आणून रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातर्फे 50 टक्के सवलतींमध्ये घरगुती पिठाची गिरणी वाटपाचा शुभारंभ केला. वसंत टेकडी येथे साई मंदिरामध्ये गरजू महिलांना सीमा त्र्यंबके यांच्या हस्ते 57 पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सौ.त्र्यंबके बोलत होत्या.
याप्रसंगी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे संस्थापक व नगरसेवक सुनिल त्र्यंबके, अध्यक्ष योगेश पिंपळे, बबलू सूर्यवंशी, महेश टाक, दिपक कुडिया, स्वाती पवळे, प्रतिक्षा राऊत, आशा कलंके, वनिता बिडवे आदि उपस्थित होते. सौ. त्र्यंबके पुढे म्हणाल्या, घरगुती पिठ गिरणीमुळे महिलांना कुठेही बाहेर न पडता घरामध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भामुळे घराजवळच दळण मिळू लागल्याने इतर महिलांना घराजवळच दळणाची सोय होणार आहे, असे सांगून महिलांच्या पाठीशी खंबरपणे उभे राहू असे सांगितले.
याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या या उपक्रमास नगर शहरासह उपनगरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांचा लाभ महिलांसह बेरोजगार तरुण देखील घेत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे म्हणाले की, 50 टक्के सवलतीच्या दरातील पिठाच्या गिरण्या या उपक्रमाला आमच्या परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार व नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या उपक्रमाचे महिलांना वर्गातून समाधान व्यक्त होत असल्याचे सांगितले. या उपक्रमाचे बबलू सूर्यवंशी, दिपक कुडिया यांनी स्वागत केले शेवटी प्रतिक्षा राऊत यांनी आभार मानले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved