अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रूग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचे गांभीर्य लक्षात घेवून लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून सात तालुक्यांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शेती, सहकार,पाणी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने योगदान देणारे लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी प्रवरा परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,
रक्तदान शिबीराबरोबरच प्रत्येक गावात वृक्षारोपण आणि गरजू व्यक्तिंना साहित्यांचे वाटप करण्यात येणार असल्याचे आ.विखे पाटील म्हणाले. सकाळी ९ वा. प्रवरानगर येथे स्मृतीस्थळावर प्रार्थना आणि स्वरसुमनांजली कार्यक्रमातून स्व.बाळासाहेब विखे पाटील यांना आदरांजली वाहण्यात येईल.
करोना संकटाचे गांभीर्य अद्याप कमी झालेले नाही.रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताचा तुटवडा रूग्णालयात निर्माण होत असल्याची परीस्थिती लक्षात घेवून इतर सर्व कार्यक्रमा ऐवजी रक्तदान शिबीराचे आयोजन सात तालुक्यात केले असल्याचे आ.विखे पाटील यांनी सांगितले.
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था,प्रवरा मेडीकल ट्रस्ट,डॉ.विखे पाटील फौंडेशन आणि जनसेवा फौंडेशनच्या सहकार्याने दिनांक २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यत आयोजित करण्यात आले असून, दिनांक २९ डिसेंबर २०२० रोजी श्रीरामपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती,
दिनांक ३० डिसेंबर लोणी येथे प्रवरा मेडीकल ट्रस्टचे रूग्णालय, राहाता शहरातील साई विठ्ठला लॉन्स, आश्वी येथील प्रवरा कला वाणिज्य महाविद्यालय, पुणतांबा येथील आशा केंद्र, डॉ.विखे पाटील फौडेशन आणि शेवगाव येथील आयुर्वेद महाविद्यालयात आणि दिनांक ३१ डिसेंबर २०२० राहुरी फॅक्टरी येथील कला वाणिज्य महाविद्यालयात रक्तदान शिबीराचा उपक्रम संपन्न होईल,
करोना संकटाच्या काळात रूग्णांना आवश्यक असलेली रक्ताची गरज लक्षात घेवून इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन आ.विखे पाटील यांनी केले आहे. लोकनेते पद्मभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी शेती, सहकार, शिक्षण आरोग्य क्षेत्रात काम करताना नेहमीच पर्यावरण चांगले राखण्यासाठी प्रयत्न केला.
त्यांच्या कार्याची आठवण म्हणून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे नियोजन करण्यात येते. यावर्षीही प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अंतर्गत येणा-या सर्व शाळा, महाविद्यालयात तसेच प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि गावपातळीवर असलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
पायरेन्स संस्थेत औषधी वनस्पतींच्या उद्यानाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे प्रवरा परिवाराच्या वतीने सांगण्यात आले. शिर्डी तसेच दाढ येथील सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून उबदार कपड्यांचे वितरण करण्यात येणार आहे. यासर्व सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved