अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जे शिक्षक आई वडिलांना सांभाळत नाहीत त्यांच्या पगारात तीस टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.
निर्णय चांगला आहे, पण ज्यांनी हा निर्णय घेतला त्यापैकी कितीजण आपल्या आई वडिलांना चांगल्या पध्दतीने सांभाळतात, कोणाच्या आई वडिलांच्या मुक्कामाची सोय गोठ्यात करण्यात आली आहे.
याचाही विचार होणे गरजेचे आहे. असे सांगत शिक्षक नेते डॉ.संजय कळमकर यांनी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचले आहेत ! आई वडीलांचा सांभाळ न करणा-या जिल्हा परिषद कर्मचा-यांच्या पगरात 30 टक्के कपात करण्याचा निर्णय लातूर जिल्हा परिषदेने घेतला आहे.
त्याच धर्तीवर नगर जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांच्या पगारात 30 टक्क्यांची कपात करून ती आई वडीलांच्या यात्यावर जमा करण्याबाबत जि. प. च्या शुक्रवारी पार पडलेल्या सभेत चर्चा करण्यात येउन त्या ठरावास तत्वतः मान्यता देण्यात आली. या पार्श्वभुमिवर पारनेर येथील कार्यक्रमास उपस्थित असलेले
शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांनी जि. प. पदाधिकाऱ्यांना टोला लगावला. महाराष्ट्र साहित्य परिषदेची पारनेर शाखा व मातोश्री प्रतिष्ठाणच्या संयुक्त विद्यमाने साहित्यिक डॉ.संजय कळमकर यांना श्रीसंत तुकाराम महाराज पुरस्काराने पद्मश्री पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष कैलास गाडीलकर व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब भूमकर यांचा शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved