Ahemednagar News : लोकसभा निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे यांचा पराभव राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निलेश लंके यांनी केला. त्यामुळे हा पराभव विखे पिता पुत्रांच्या खूप जिव्हारी लागला असल्याचे आता आपल्याला दिसून येत आहे. यामागे जर प्रमुख कारण पाहिले तर जून 2024 मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पारनेर नगरपंचायतीला विविध प्रकारचे विकास कामे करता यावीत याकरिता एक कोटी 81 लाख रुपयांचा निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेली होती.
परंतु त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला. परंतु पाहायला गेले तर झालेल्या निवडणुकीमध्ये डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्व नगरसेवकांनी 750 मतांचे मताधिक्य दिलेले होते.
परंतु असे असताना देखील विखे पिता पुत्रांनी या पराभवाच्या रागातून पारनेर नगरपंचायतीच्या निधीला कात्री लावल्याचा आरोप पारनेर नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक अशोक चेडे यांच्यासह विखे गटाचे नगरसेविका विद्या गंधाडे, नवनाथ तुकाराम सोबले आणि शालुबाई ठाणगे यांनी केला आहे.
पारनेर नगरपंचायतीच्या निधीला पालकमंत्र्यांची कात्री
पारनेर नगरपंचायतीला जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) माध्यमातून विविध विकासकामांसाठी जून २०२४ मध्ये जवळपास १ कोटी ८१ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना सर्व नगरसेवकांनी ७५० मतांचे मताधिक्य दिले. मात्र, असे असतानाही विखे पिता- पुत्रांनी पराभवाच्या शल्यातून निधीला कात्री लावल्याचा आरोप पारनेर नगरपंचायतीचे भाजप नगरसेवक अशोक चेडे यांच्यासह विखे गटाच्या नगरसेविका विद्या गंधाडे, नवनाथ तुकाराम सोबले, शालूबाई ठाणगे यांनी केला आहे.सुजय विखे यांचा पराभव झाल्याच्या रागातूनच या विकासकामांच्या निधीला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कात्री लावली आहे.
लोकसभा निवडणुकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर पाणीपुरवठा योजना १०० कोटी, बाल रुग्णालय, पारनेर आगाराची इमारत, खरेदी विक्री संघ इमारत यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र, लोकसभा निवडणूक संपताच विखे पिता-पुत्रांनी हात वर करत हा निधी तर सोडाच प्रशासकीय मंजुरी मिळालेला निधी रखडविल्याचा आरोपही त्या चार -पुत्रांनी नगरसेवकांनी केला आहे. याबाबत संपर्क न झाल्याने पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
या कामांना होती मंजुरी…
नगरपंचायत अंतर्गत नगरसेवकांच्या शिफारशीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर होता. प्रभाग क्रमांक १ मध्ये पुणेवाडी (म्हस्के मळा) वस्तीवरील भुयारी गटार सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता ३० लाख रुपये, कुंभारवाडी ते गोसावी बाबा रस्ता सिमेंट कॉक्रिटीकरण १० लाख, प्रभाग क्रमांक ४ भैरवनाथ मंदिर सोबलेवाडी सभामंडप व वॉल कंपाऊंड ५० लाख,
प्रभाग क्रमांक ७ मधील वेताळ वस्ती भुयारी गटार सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता १० लाख, शिंदे वस्ती (वैद वस्ती) सभामंडप १५ लाख. सिद्धार्थ वसतिगृह ते गोविंद चव्हाण वस्ती भुयारी गटार सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता २५ लाख,
शिवाजी शेलार ते संदीप पितळे घरापर्यंत भुयारी गटार सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता ६ लाख, प्रभाग क्रमांक १६ जोगेश्वरी मंडप सभा मंडप १२ लाख, पोपट कावरे ते गजानन कावरे वस्ती खडीकरण व डांबरीकरण २० लाख, वडनेर रोड ते देशमाने खडीकरण व डांबरीकरण ३०० मीटर १५ लाख आदी कामांचा समावेश होता. या कामांचा निधी अडविल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.
..तर आम्हाला वेगळा पर्याय शोधावा लागेल..
राज्यामध्ये महायुतीचे सरकार व पालकमंत्री भाजपचा असतानाही पदाधिकारी व नगरसेवकांचा जर र विकास निधी अडविला जात असेल, तर आम्हाला पर्याय शोधावा लागेल, असा इशाराही यावेळी नगरसेवकांनी दिला आहे.
कामांची प्रशासकीय मंजुरी रद्द
शासन निर्णयानुसार १४ ते १५ हजार लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतींना दीड कोटी रुपयांच्या निधीची तरतूद जिल्हा नियोजनच्या माध्यमातून करण्यात येते. परंतु, पारनेर नगरपंचायतीने जवळपास अडीच कोटी रुपयांची कामे प्रस्तावित केली होती.
जिल्हा नियोजनच्या माध्यमातून १ कोटी ८५ लाख रुपयांच्या विविध विकासकामांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी देता येत नसल्याने ही प्रशासकीय मंजुरी रद्द केल्याची माहिती जिल्हा नियोजनचे नगरपंचायत अधिकारी प्रशांत खांडकेकर यांनी दिली.