डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली -भगवान फुलसौंदर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-समता, न्याय, हक्क, अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य समाज परिवर्तनाची नांदी ठरली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्यांच्या आयुष्याला नवा प्रकाश देण्याचे कार्य केले. समता, बंधुता, न्याय सर्वांना मिळावा म्हणून आयुष्यभर संघर्ष केल्यामुळेच आज परिवर्तन दिसून येत असल्याची भावना माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी व्यक्त केली.

अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ (नवी दिल्ली), जय युवा अकॅडमी, रयत प्रतिष्ठान, आधारवड बहुद्देशीय संस्था, द युनिव्हर्सल फाऊंडेशन, रायझिंग युथ अ‍ॅण्ड ट्रायबल फाऊंडेशन, उडान फाऊंडेशन, स्वप्नपुर्ती फाऊंडेशन, माहेर फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच बालिकाश्रम रोड, लेंडकर मळा येथील अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ संचलित सर्वधर्मीय वधुवर सूचक केंद्राच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी महापौर फुलसौंदर बोलत होते.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक योगीराज गाडे, संतोष ग्यानप्पा, शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, ओबीसी सेलचे अमित खामकर, संत सावतामाळी युवक संघाचे अशोकराव तुपे, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, गणेश बनकर, जालिंदर बोरुडे, संतोष हजारे, जिल्हा माळी संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले, उपाध्यक्ष मेजर नारायणराव चिपाडे, राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल, डॉ. सुदर्शन गोरे, सचिव सूर्यकांत रासकर आदि उपस्थित होते.

शाहीर दिलीप शिंदे, शाहीर वसंत डंबाळे यांनी आपल्या पोवाड्यातून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कार्य विशद केले. प्रा. माणिक विधाते यांनी विवाह जमवण्यासाठी वरपिता व वधुपिता यांची आज चांगलीच दमछाक होते. दिव्यांग, विधवा, विधुर यांच्या विवाहासाठी सुद्धा अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी वधुवर सुचक केंद्र मोलाची भूमिका बजावीत आहे. सर्वधर्मीय वधू-वर सूचक केंद्र सुरू केल्याने सर्वच समाजाचा कौटुंबिक प्रश्‍न सोडविण्यासाठी अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघाचे कार्य खरोखर अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी आपल्या मनोगतामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक संस्था उल्लेखनीय कार्य करीत आहे. शासनाने सामाजिक संस्थांची दखल घेऊन त्यांना सहाय्य केले पाहिजे. थोर समाज सुधारकांची जयंती कृतिशीलपणे राबविण्यात आली तर निश्‍चितच परिवर्तन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात अ‍ॅड. भानुदास होले यांनी गेल्या वीस वर्षापासून अहमदनगर जिल्हा माळी सेवा संघ अविरतपणे कार्यरत आहे. समाजातील तळागाळातील व्यक्तींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

पाहुण्यांचे स्वागत मेजर नारायण चिपाडे व सूर्यकांत रासकर यांनी केले. राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ. अमोल बागुल यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान दिले. विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या वतीने आगळ्या-वेगळ्या पध्दतीने महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमासाठी अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. सुनील महाराज तोडकर,

अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, अ‍ॅड. अमोल जाधव, डॉ. गौरी सामलेटी, पोपट बनकर, आरती शिंदे, संग्राम साळवे, आशिष रणनवरे, किरण सातपुते, विद्या तन्वर, विनायक नेवसे, रजनी ताठे, सागर आलचेट्टी, रमेश चिपाडे, नंदकुमार वनवे, अशोक रासकर, मारुतराव गाडेकर, राजेश शिंदे, संतोष हजारे, राहुल धीवर, अक्षय वारे, चेतन सायनर, अंकुश पानमळकर, नंदा पुंड, अ‍ॅड. संगीता पाडळे, अशोक कासार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. महेश शिंदे यांनी केले. आभार अ‍ॅड. अनिता दिघे यांनी मानले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment