डॉ.विखे पाटील आयटीआय मध्ये मशिनचे प्रात्याक्षिक आधुनिक युगात सीएनसी मशिनचे ज्ञान आवश्यक

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-  कोरोनाच्या महामारीत अनेक तरुणांच्या नोकर्‍या गेल्या 2 वर्षांपासून नवीन जॉब मिळेना. परंतु आता परिस्थिती सुधरत असून अनेक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल कामगारांची गरज निर्माण झाली आहे.

पुढील काळात ही संधी अधिक व्यापक होणार आहे. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांमध्ये मशिनिस्ट, टर्नर, फिटर या आयटीआय ट्रेडला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आधुनिक युगात सीएनसी मशिनचे ज्ञान आवश्यक आहे.

त्यासाठी युवकांनी आयटीआयचे कोर्स करुन तांत्रिक ज्ञान आत्मसात करुन रोजगार प्राप्त करावा, असे आवाहन प्राचार्य राम क्षीरसागर यांनी केले. एमआयडीसी येथील डॉ.विखे पाटील आय.टी.आय.मध्ये सीएनसी मशिनचे प्रॅक्टीकल व प्रोग्रामिंगचे प्रात्यक्षिक दिले जात आहे. यावेळी मार्गदर्शन करतांना श्री.क्षीरसागर बोलत होते.

याप्रसंगी निदेशक जी.आर.जाजगे, व्ही.आर.काळे, एन.एम.नागरे उपस्थित होते. प्राचार्य क्षीरसागर पुढे म्हणाले. डॉ.विखे पाटील आयटीआय मधील विविध ट्रेडमुळे अनेकांना रोजगाराच्या संधी मळाल्या आहेत. सध्या या प्रशिक्षणात मशिनिस्ट, टर्नर, फिटर ट्रेड पूर्ण करण्यासाठी 2 वर्षे लागतात.

मात्र नंतर चांगल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध होतात. तसेच उत्पादन, निर्मिती क्षेत्र, दळणवळण, रेल्वे, जहाज निर्मिती, दुरुस्ती काम, संरक्षण सयंत्र व युद्धसाहित्य निर्मिती क्षेत्र, व्हीआरडीई, एमआयडीसी मधील सर्व कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तसेच स्वयंरोजगार उभाण्यासही वाव आहे.

यावेळी गटनिदेशक एस.डी.काकडे यांनी विविध ट्रेड विषयी सखोल मार्गदर्शन केले ते म्हणाले. या ट्रेडस् मध्ये विविध मशिनचे ज्ञान व प्रत्याक्षिक दिले जात. उदा. मिलिंग मशिन, सरफेज ग्रॉईंडर, सिलेड्रीकल ग्राईंडर, लेथ मशिन, रेडियल ड्रिलिंग मशीन आदि.

या ट्रेडचे प्रशिक्षण घेतल्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षातही प्रवेश घेता येतो, असे सांगितले. विखे पाटील आयटीआयच्या विविध ट्रेडस्मधील 200 अधिक माजी विद्यार्थी नामांकित कंपनीत कायम स्वरुपी काम करत आहेत.

प्रवेशासाठी प्राचार्य राम क्षीरसागर (मो.8554990220), गटनिदेशक एस.डी.काकडे (मो. 9850985241) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe