अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याने एका विद्यार्थीनिने आत्महत्या केली आहे. ही घटना श्रीगोंदा शहरात गुरुवारी दुपारी घडली.याबाबत सविस्तर असे की, शहरातील एका नामांकित विद्यालयात ती शिकत होती.
दहावीच्या परीक्षेत तिने खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचे चीज देखील झाले. काल जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात तिला 87टक्के एवढे गुण मिळाले.
पण आपल्याला अपेक्षित असणारे गुण न मिळाल्यामुळे ती नाराज झाली अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे नैराश्यातून तिने गळफास घेऊन
सआपली जीवनयात्रा संपवली.चांगले गुण मिळूनही या विद्यार्थिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा