सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना सात- बारा मिळण्यास येतेय अडचण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत असल्याने जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालये आता पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कोरोनामुळे गेले अनेक महिन्यांचे रखडलेल्या कामांसाठी नागरिक देखील आता सरकारी कार्यालयांमध्ये गर्दी करू लागले आहे.

मात्र डाऊन सर्व्हरमुळे कामे होण्यास विलंब होत असल्याने सरकारी अधिकारी वैतागले आहे. सर्व्हरमधील अडचणींमुळे नेवासा तालुक्यात तलाठ्यांची डोकेदुखी वाढली आहे .

कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याने डिजिटल सिग्नेचर तहसील कार्यालयात जमा करणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, डीआयएलआरएमपी सर्व्हर मागील एक महिन्यापासून स्पीड नसल्याने, तसेच बहुतांश वेळ बंदच असल्याने तलाठ्यांच्या कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

रोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या कार्यालयीन वेळेत सर्व्हरचा स्पीड कमीच असतो. कधी कधी तर तो बंदच असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना सात-बारा उतारे देणे शक्य होत नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment