मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत चार तिर्थक्षेत्रांच्या समावेशामुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाला पाठबळ !

Ahmednagarlive24 office
Published:
shirdi

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत जिल्ह्यातील चार तीर्थस्थानांचा समावेश झाल्याने जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकासासाठी सुरू केलेल्या कामाला पाठबळ मिळाले आहे, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री विखे यांनी पहील्याच जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने आराखडा तयार करून रोजगार निर्मिती करण्याचे जाहीर केले होते.

त्यादृष्टीने जिल्ह्याचा तिर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखडा तयार करून कामही सुरू झाले. याचाच एक भाग म्हणून श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदीर परीसर विकास आरखड्याची महायुती सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केल्याने मंत्री विखे पाटील यांनी याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ज्ञानेश्वर सृष्टीच्या संकल्पनेला बाळ मिळण्याचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.

शिर्डी येथे साईबाबांच्या जीवनावर थीम उभारण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असल्याने थीम पार्कचा आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तिर्थस्थानाच्या विकासाचा आराखडा तयार होत महायुती सरकारने केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमुळे जिल्ह्याच्या तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाच्या संधी अधिक निर्माण होण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

राज्य सरकारच्या योजनेत देशातील ७३ आणि राज्यातील ४ तीर्थस्थानांचा समावेश आहे. जिल्ह्यातील शिर्डी, शनिशिंगणापूर, भगवानगड आणि सिद्धटेक गणपती या तिर्थस्थानांचा समावेश झाल्याने या ठिकाणी भाविकांची गर्दी अधिकच वाढणार आहे.

विशेष म्हणजे या सर्व योजनांमध्ये सहभाग घेणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांसाठी अर्थिक तरतूद मोठ्या प्रमाणात केल्याने योजनेला प्रतिसाद पाहाता तीर्थस्थानाच्या ठिकाणी रोजगारनिर्मिती होईल.

जिल्ह्यातील तरूणांना रोजगार हाच विषय अधिक महत्त्वाचा मानून त्यावर सुरू केलल्या कामाला मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची मिळणारी जोड अधिक रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरेल, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

तिर्थक्षेत्र पर्यटन विकास आराखडा महत्वपूर्ण ठरेल जिल्ह्याला लाभलेला अध्यात्मिक वारसा खूप मोठा आहे. या भूमीतील तीर्थस्थानांचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येतात.

महायुती सरकारच्या या योजनेमुळे राज्यातील भाविक जिल्ह्यात येण्यासाठी आकर्षित होतील. यातून त्या ठिकाणच्या तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल. यासाठी जिल्ह्याचा तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचा आराखडा महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe