‘ह्या’ कारणामुळे जरे कुटुंबीयांनी घेतले उपोषण मागे..

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे अजूनही फरार आहे. त्याला अटक करावी, या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्याच्या परिवारातील इतर सदस्यांनी शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.

बोठे याला लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर सायंकाळी जरे कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले. रुणाल जरे म्हणाले, बोठे हा रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे.

बोठेला अटक कधी करणार याचे उत्तर कोणीही देत नाही. म्हणून आम्ही उपोषण सुरु केले आहे. सायंकाळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी जरे कुटुंबियांची भेट घेऊन तपास सुरू आहे, लवकरात लवकर बोठेला अटक करू, असे आश्वासन दिल्यानंतर जरे कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर