अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून गेल्या दोन दिवसात जिल्ह्यमध्ये अनेक अपघातांची नोंद झाली असून यामध्ये अनेकांचा बळी गेला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.
नुकतेच अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर रुंभोडी शिवारात लोहटेवाडीजवळ डंपर व स्कुटी(मोपेड) गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाला.
या अपघातात इंदोरी येथील मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि,
कोल्हार घोटी राज्यमार्गावर रस्त्याचे काम करणारा डंपर राजूरच्या दिशेने जात असताना शाळेतून घरी येणाऱ्या शिक्षिका वैशाली नितीन नवले आणि त्यांची कन्या अवंतिका नवले यांच्या स्कुटी गाडीला डंपरने जोराची धडक दिली.
या अपघातात स्कुटी गाडीवरील दोघी मायलेकी वैशाली नवले व अवंतिका नवले या जखमी झाल्या आहेत. जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात स्कुटी गाडी ही डंपरच्या समोरील चाकाखाली गेल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved