भरदिवसा दोघास बेदम मारहाण करत दुकानावर केली तुफान दगडफेक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-भरदिवसा शहरातील बाजारपेठेतील येथील दुकानात घुसून दुकानातील साहित्य रोडवर फेकून देत दुकानदारास लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करण्याची आणि दुकानावर तुफान दगडफेक करण्याची घटना शहाजी रोड (घासगल्ली) येथे घडली.

याप्रकरणी १५ ते २० जणांच्या जमावाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अर्शान अंजुम तांबटकर (रा.घासगल्ली, शहाजी रोड) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मंगळवारी (दि.५) दुपारी १ ते २ वाजण्याच्या दरम्यान आपण व आपला भाऊ असे दोघेजण घासगल्लीतील दुकानात बसलेलो असताना आरोपी वसिम जमशेद शेख (रा.बुरुडगाव रोड),

अफनान समीर शेख (रा.मुकुंदनगर), वसिम याचा मामा लाला (पूर्ण नाव माहित नाही) आणि त्यांच्या सोबत १५ ते २० अनोळखी इसम दुकानात आले व त्यांनी शिवीगाळ करत दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून द्यायला सुरुवात केली.

याबाबत विचारणा केली असता आम्हा दोघा भावांना या जमावाने लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यानंतर जमावाने दुकानावर जोरदार दगडफेकही केली.

या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिसांनी सदरील १५ ते २० जणांच्या जमावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोना.बोरूडे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment