अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांचे नगर येथे बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर दौलतराव शिवराम जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दौलतराव शिवराम जाधव यांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मार्फत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. दौलतराव जाधव यांची कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळख आहे.
त्यांनी शिर्डी शहर पोलीस स्टेशन येथे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले होते तर कोपरगाव शहर पोलीस स्टेशन मध्येही त्यांनी पोलिस निरीक्षक पदावर काम केले आहे.
कोपरगाव तालुक्याचा अभ्यास त्यांचा चांगला असून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याचे काम ते नक्की करतील अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.
सध्या ते श्रीगोंदा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. काल त्यांना नियुक्तीचे पत्र प्राप्त झाले आहे लवकरच कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचा कारभार ते स्वीकारतील.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved