‘एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है,’; पालकमंत्र्यांचे सूचक विधान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-पाथर्डी व शेवगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव परिसरामध्येही पाहणी केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत वक्तव्य केले. ‘एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेंच्या येण्याने राष्ट्रवादी अजून बळकट होईल.

तसेच पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले कि, ‘एकनाथ खडसे अभी झाकी है, बाकी सब आना बाकी है,’ पालकमंत्र्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

खडसेंबरोबरच आणखी काही जण राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे यावेळी संकेत दिले. जिल्ह्याच्या माजी पालकमंत्र्यांची खडसेंवर टीका एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये जी किंमत होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही.

खडसे यांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप होईल, असे वक्तव्य भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी केले होते.

या वक्तव्याचा ही मुश्रीफ यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत किंमत मिळणार का? हे त्यांना थोड्याच दिवसांत चांगले समजेल. पण यावेळी मात्र मुश्रीफ यांनी एकनाथ खडसे यांना नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार? याबाबत अधिक बोलणे टाळले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment