दिनेश भालेराव यांची सहसचिवपदी निवड

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-  अहमदनगर येथील क्रीडा मार्गदर्शक दिनेश लक्ष्मण भालेराव यांची महाराष्ट्र अथलेटिक्स असोसिएशनच्या सहसचिवपदी बिनविरोध निवड झाली आहे .

तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर राज्य संघटनेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड झाली आहे . महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशनची नुकतीच निवडणूक बिनविरोध संपन्न झाली.

नगर येथील दिनेश भालेराव यांनी ॲथलेटिक्स क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, तसेच क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचा असणारा अनुभव लक्षात घेऊन त्यांना सहसचिव पदाची पुन्हा एकदा पुणे विभागातून संधी मिळाली आहे.

नगर येथे ट्रॅक रेसर्स फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय खेळाडू घडवण्याचे कार्य मार्गदर्शक दिनेश भालेराव यांनी केली आहे.

या निवडीबद्दल दिनेश भालेराव यांचे अध्यक्ष आदील सुमारीवाला ,छत्रपती पुरस्कार विजेते रंगनाथ डागवाले, छत्रपती पुरस्कार विजेते सुनील जाधव , महाराष्ट्र शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर ,

माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक आप्पासाहेब शिंदे ,माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे , अध्यक्ष सुनिल गागरे , संदीप घावटे ,

अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन व ट्रॅक रेसर्स स्पोर्टस फाऊंडेशन अहमदनगर चे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अभिनंदन केले .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment