Gram Panchayat Election : राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, पहा नगरमधील कोणत्या

Published on -

Ahmednagar News :सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. जरी पावसाळा असला तरी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या भागातील निवडणुका होणार आहेत.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांतील २७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ४ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी हा कार्यक्रम जाहीर केला आहे.

यामध्ये नगर जिल्ह्यातील नगर- ३, श्रीगोंदा- २, कर्जत- ३, शेवगाव- १, राहुरी- ३ आणि संगमनेर- २ एवढ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

असा आहे कार्यक्रम

५ जुलैला निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध
१२ ते १९ जुलै उमेदवारी अर्ज
२० जुलैला अर्जांची छानणी
२२ जुलैर्यंत अर्ज मागे घेता येणार
४ ऑगस्टला मतदान
५ ऑगस्टला मतमोजणी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe