अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कोरोना टाळेबंदीच्या काळातील वीज बिलाबाबत सवलत देण्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, आता ऊर्जामंत्र्यांनी याबाबत जनतेची फसवणूक करत कोणतीही सवलत देता येणार नसल्याचे सांगून नागरिकांना पूर्ण बिल भरावे लागेल, असे जाहीर केले.
त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नसून हे सरकार फसवे असल्याची टीका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केली. कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलाची भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी होळी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
नगर शहर जिल्हा भाजपच्या वतीने कोरोना लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीज बिलाची भाजपच्या वतीने होळी करून निषेध करण्यात आला. शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी, प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर मालन ढोणे,
महिला व बालकल्याण समिती सभापती लता शेळके, विवेक नाईक, जगन्नाथ निंबाळकर, माजी गटनेते सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, महेश नामदे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, तुषार पोटे, बाळासाहेब कोतकर, अजय ढोणे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved