नगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक मुनोत व शाह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर रेल्वे स्थानकच्या सल्लागार समितीपदी उद्योजक प्रशांत मुनोत व विपुल शाह यांची नियुक्ती करण्यात आली. रेल्वे स्थानक येथे स्टेशन मॅनेजर एन. पी. तोमर, वाणिज्य अधिकारी आर. एस. मीना यांच्या हस्ते मुनोत व शाह यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हरजितसिंह वधवा उपस्थित होते. मुनोत यांची निवड मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅग्रिकल्चर याद्वारे झालेली असून,

त्यांची रेल्वे समितीवर दुसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे, तर विपुल शाह यांची निवड महाराष्ट्र मेकॅनिकल इंजिनियर असोसिएशन संचलित अहमदनगर जिल्हा प्रवासी संघटनेद्वारे प्रवाशांचे प्रतिनिधी म्हणून झालेली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment