अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘प्रस्थापित राजकीय पक्षांनी बहुजन समाजाचे नुकसान केले. राजकारणाच्या लढाईत बहुजन समाजाचे प्रश्न प्रलंबीत राहिले असून, न्याय, हक्कासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे.
बहुजनांच्या हक्कासाठी बहुजन समाज पार्टी पर्याय म्हणून पुढे आली असून, नगर जिल्ह्यात देखील चांगला प्रतिसाद मिळत असल्याची भावना प्रदेश सचिव बाळासाहेब आवारे यांनी व्यक्त केली. सिध्दार्थनगर येथे झालेल्या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकार्यांच्या आढावा बैठक व पदाधिकारी नियुक्तीच्या कार्यक्रमात आवारे बोलत होते.
यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, शहराध्यक्ष संतोष जाधव, विकास साळवे आदिंसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पुढे आवारे म्हणाले की, येत्या ग्रामपंचायत व नगरपालिका निवडणुकीत देखील बहुजन समाज पार्टी संपुर्ण ताकतीने निवडणुक लढविणार आहे.
जिल्ह्यातील नुतन पदाधिकार्यांनी पक्ष वाढीसाठी सामाजिक कार्यात योगदान देऊन वंचित, बहुजनांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन त्यांनी केले. बैठकीच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
बसपाचे महाराष्ट्र प्रभारी खासदार अॅड. वीरसिंह, प्रमोद रैना व प्रदेशाध्यक्ष संदीप ताजणे यांच्या आदेशान्वये नुतन पदाधिकार्यांच्या नियुक्त्या पुढील प्रमाणे झाल्या. जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हा महासचिव मच्छिंद्र ढोकणे, जिल्हा सचिव सचिन घोडके, बाळासाहेब मधे,
अहमदनगर विधानसभा अध्यक्ष प्रतिक जाधव, उपाध्यक्ष आदीनाथ आलचेट्टी, नगर विधानसभा बीव्हीएफ अतुल काते, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय सोनवणे, उपाध्यक्ष अमोल शेटे, महासचिव आनंद कांबळे, पारनेर विधानसभा उपाध्यक्ष गणेश साळवे.
जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी नवनिर्वाचित पदाधिकार्यांना सामाजिक कार्यासाठी व पक्ष बळकट करण्यासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचे सांगितले. नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी संजय डहाणे यांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
सर्वसामान्य व्यक्ती केंद्रभूत मानून पक्षाच्या ध्येय धोरणानुसार पक्ष वाढीसाठी कार्य करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहर कमिटी व विधानसभा कमिटीच्या वतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved