उड्डाणपुलाच्या कामात अडथळा ठरणारी जलवाहिनी स्थलांतरित करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला व नगरकरांचा जिव्हाळयाचा बनलेला प्रश्न म्हणजे उड्डाणपूल… नुकतेच या बहुचर्चित उड्डाण पुलाच्या कामासाठी सुरुवात करण्यात आली आहे.

तसेच हें काम अतिशय वेगाने सुरु असल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान शहरातील उड्डाणपुलाच्या कामात महापालिकेची जलवाहिनी अडथळा ठरत असून, ही जलवाहिनी तातडीने स्थलांतरित करण्याचा आदेश खासदार डॉ.सुजय विखे यांनी सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे.

शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची खासदार विखे यांनी पाहणी केली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक योगिराज गाडे,माजी नगरसेवक नगरसेवक निखिल वारे, प्रशांत दारकुंडे,

महानगरपालिका उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे,पाणीपुरवठा अभियंता रोहिदास सातपुते, आर.जी. मेहत्रे, शहर अभियंता सुरेश ईथापे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दिग्विजय पाटणकर,

श्रीकांत लोखंडे, मुनीर सय्यद,वाहतूक पोलीस निरीक्षक देवरे,उड्डाणपुलाचे ठेकेदार शेळके, वीज वितरणचे ठेकेदार खेडकर, नगर रचनाकार वैभव जोशी आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलाच्या कामासाठीच्या भूसंपादनाचे काम पूर्ण झाले आहे. उड्डाणपुलाच्या कामात येणारे अडथळे दूर करण्याच्या सूचना यावेळी विखे यांनी केल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News