अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे सत्र सुरु आहे. जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखील बदल्या या काळात झाल्या व बदली झालेले अधिकारी आपापल्या नेमलेल्या जागी रुजूही झाले.
मात्र नगर जिल्हा परिषदेत एक वेगळाच किस्सा घडला आहे. जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविल्या आहेत.
मात्र बदल्या होऊनही अनेक कर्मचारी मूळ जागेवर कार्यरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत, महिला बालकल्याण, शिक्षक प्राथमिक,
अर्थ, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य विभाग या विभागातील कार्यरत कर्मचाऱ्यांची बदल्यांची प्रक्रिया कोरोनाच्या प्रादुर्भावातही प्रशासनाने केल्या आहेत.
याच अनुषंगाने झेडपीमधील काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. नेमके अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या ठिकाणी ठेवले की कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी हजर व्हायचे नाही,
असा गोंधळ सध्या निर्माण झालेला आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरु असून त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved