भाषेची अडचण लक्षात घेता राज्यातील वैदू समाजाच्या जातपंचायतीचे चाललेले कामकाज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने बंद पडली. मात्र याबाबत वैदू समाजाचे पंच म्हणाले ही पंचायत नव्हती तो समाजाचा मेळावा होता. तर पोलीस आल्यावर मेळावा लगेच कसा थांबला. छुप्या मार्गाने ती पंचायतच होती.
राज्य सरकारने जात पंचायतींना बंदी आणून भटक्यांचे सुद्धा न्यायनिवाडे प्रचलित न्यायव्यवस्थेप्रमाणे चालतील असे आदेश काढले. भटक्या समाजाच्या दृष्टीने मढी येथील पंचायतीला सर्वोच्च न्यायालयाचा दर्जा राहून पंचांनी दिलेला निर्णय मढी नंतर कोठेही बदलत नव्हता.

प्रचलित न्यायव्यवस्थेकडे भटका समाज दाद मागत नव्हता. पूर्वी वैदू समाजाची सर्वात मोठी जातपंचायत मढी येथे भरून तीन चार दिवस कामकाज चाले. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास राज्यातील जोशी समाजाचा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार घेण्यासाठी नाशिकच्या कार्यकर्त्या कोमल वर्दे आल्या.
शेजारीच गर्दी पाहून त्यांनी चौकशी केली असता वैदू समाजाची जात पंचायत सुरू असल्याचे कळताच त्यांनी पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना कळवले. पोलिसांनी धाव घेतली त्यावेळी पोलिसांना पंचायत नसून मेळावा आहे असे त्यांनी सांगितले.
असे सांगतच त्यांच्या भाषेत संवादास सुरुवात करून आक्रमक रूप घेतले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या निदर्शनास प्रकार आणून देणार म्हणतात पोलिसांनी पंचायतीचे कामकाज बंद करून लोकांना पांगवले त्यानंतर वैदू कार्यकर्ते व अनिस कार्यकर्ते यांच्यात बरीच गरमागरम चर्चा झाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर हवालदार आदिनाथ बडे सुखदेव धोत्रे यांनी वैदू बांधवांना कायद्याची कल्पना देत पांगवले.