मराठी दिनदर्शिकेनुसार सध्या आषाढ महिना सुरु आहे. आषाढी एकादशीनंतर चातुर्मास सुरु होतो. या चातुर्मासाच्या काळात म्हणजे चार महिन्याच्या काळात भगवान विष्णू हे विश्रांती घेत असतात अर्थात निद्रावस्थेत असतात अशी आख्यायिका आहे.
दरम्यान थोडं जुन्या काळात डोकावलं तर आषाढ महिन्यात लग्नकार्य होत नव्हते. परंतु आता काळ बदलला आहे. व्याख्याही बदलल्या आहेत. त्यामुळे आषाढ महिन्यात, चातुर्मासातही विवाह होत आहेत. चातुर्मासातही आता लग्नाचा बार उडवता येणार आहे, असे येथील पुरोहित मंडळींनी सांगितले.
जुलै ते नोव्हेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ३३ विवाह मुहूर्त असल्याचे ‘दाते पंचांग’त नमूद करण्यात आले आहे. दिवाळी झाली की, तुळशीविवाह होतो आणि नंतर लग्नकार्य सुरू होतात. मात्र, सध्या नोकरी किंवा इतर अडचणींमुळे अनेक जण आपापल्या सोयीने लग्नकार्य करतात.
शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा काळ पावसाळ्याचा असल्याने प्रवासासाठी लोकांकडे साधने उपलब्ध नसायची. त्यामुळे पंचांगामध्ये लग्नमुहूर्त दिले जात नव्हते, तसेच हा काळ चातुर्मासाचाही ओळखला जातो.
या काळात कुणी लग्न करीत नव्हते, पण आता काळ बदलला आहे. लग्न कार्यासाठी कार्यालये, बैंक्वेट हॉल अशा विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांनी चातुर्मासातही लग्नकार्य करण्यास पसंती दिली आहे.
हे आहेत लग्न मुहूर्त?
जुलै : २७, २८, २९
ऑगस्ट : १०, १३, १४, १६, १८, २३, २७, २८
सप्टेंबर : ५, ६, १५, १६
ऑक्टोबर : ७, ९, ११, १२, १३, १७, १८, २६
नोव्हेंबर : ७, ८, ९, १०, १३