‘प्रत्येक जण मनःपूर्वक समाजकारण करतोय’ , आ.संग्राम जगताप म्हणतात …

Published on -

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : अहमदनगरमध्ये मागील आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आता याचा शिरकावं ग्रामीण भागातही व्हायला लागला आहे. यासंदर्भात सरकार तसेच प्रशासन व्यवस्थित कार्यवाही करत आहेत.

या संकटमय परिस्थितीमध्येदेखील राष्ट्रवादीतर्फे विकास अजेंडा समोर ठेवून कार्य चालू आहे. पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता तन, मन व धनाने समाजकारण करीत आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

तपोवन रोड येथे नागरिकांच्या सोयीसाठी शरद पवार विचार मंचच्या वतीने विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी स्वखर्चाने पथ दिवे बसवले. या पथदिव्यांचा लोकार्पण आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक बाळासाहेब पवार, विनीत पाऊलबुध्दे, सुनिल त्रिंबके, राजीक सय्यद, शकिल सय्यद, राज मोहंमद सय्यद,

कैस शेख, तन्वीर मन्यार, शाकीर सय्यद आदि उपस्थित होते. तपोवन रोड, लक्ष्मीनगर थ्रिडी कॉर्नर परिसरात पथदिवे नसल्याने रात्रीच्या अंधारात अनेक लहान मोठे अपघात घडत होते. पथदिव्यांनी परिसर उजळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करुन आभार मानले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe