कोरोना मुक्तीसह नववर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती व्हावी : महसूलमंत्री थोरात

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-  दोन वर्षापासून जगावर कोरोनाचे सावट आहे. या काळात सर्वांनी खबरदारी घेतली. नव्याने तिसरी लाट व ओमायक्रॉनचा धोका वाढतो आहे. कोरोना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने लसीकरण करुन घ्यावे.

गर्दी न करता मास्कसह नियमांचे पालन करुन राज्य व देश कोरोनामुक्त करावा. २०२२ या नववर्षांत प्रत्येकाला पुन्हा पूर्वीसारखे कोरोना नसलेले आनंदाचे दिवस येवोत.

संकल्पपूर्ती होऊन प्रत्येकास नवीन वर्षे आरोग्यदायी, आनंदाचे व यशस्वी जावो, अशा शुभेच्छा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जनतेला दिल्या. ते म्हणाले, भूतकाळ मार्गदर्शक असून भविष्याची वाटचाल त्यावर ठरते.

कोरोना मुक्तीसह नववर्षांत प्रत्येकाने एक चांगला संकल्प करून सामाजिक बांधलकी ठेवून राष्ट्र हितासाठी कार्य करावे. २१ व्या शतकातील समृद्ध भारत देशाच्या निर्मितीत प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मंत्री थोरात यांनी केले.

आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले, धावपळीच्या जीवनात मानसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून चांगले आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे.

कोरोनातून बाहेर पडून २०२२ या नववर्षात राज्य व देशाच्या विकासासाठी समतेचा विचार घेऊन सर्वांनी काम करा. नवीन वर्षात प्रत्येकाची संकल्पपूर्ती होऊन हे वर्षे आरोग्यदायी, आनंदाचे जावो, अशा शुभेच्छा दिल्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe