अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 : आज श्रीरामपूरची बाजारपेठ अशोक कारखाना व उद्योग समुहामुळेच तग धरुन आहे.
त्यामुळे तरुण व्यावसायिक यापुढे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालीच आपले व्यवसाय शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन सुरु ठेवणार असल्याचे मत व्यावसायिकांनी जाहीर केले.

या संदर्भात तरुण व्यावसायिक राम सिंधवाणी, मनोज दिवे, ऋषभ संचेती, रिंकू चावला, संदीप सोनवणे, यासह अनेक तरुण व्यावसायिकांनी एक पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
यापुढे लोकशाही विकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीने आघाडी मजबूत करणार असून भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनानुसारच सर्व काही निर्णय घेतले जातील असं या पत्रकात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews