खळबळजनक ! ‘या’ तालुक्यात शिर छाटलेला मृतदेह सापडला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात आज अत्यंत खळबळजनक घटना घडल्या आहेत. नगर तालुक्यातील दरेवाडी येथे तरुण तरुणीचा मृतदेह सापडल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा एक अतिशय धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडला आहे.

शेवगाव शहरातील नगर रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) शेजारील मोकळ्या जागेत एका 60 वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान यामध्ये धक्कादायकबाब म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका 15 वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे.

या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत एका अज्ञाताने शेवगाव पोलिसांना फोन करुन या मृतदेहाची माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.

या मृतदेहाशेजारी भांडी, पेटी, गोणपाट, काड्याकुड्या असे अवास्तव पडलेले दिसून आले आहे. मृतदेहाला मुंडके नसल्याने पोलिसांना ओळख पटविणे अवघड बनले आहे. पोलिसांनी नगर येथील श्वास पथकाला पाचारण केले आहे.

दरम्यान हा धक्कादायक प्रकार नागरिकांना समजताच घटनास्थळाकडे नागरिकांनी एकच गर्दी केली होती. हा मृतदेह कोणाचा आहे? नेमके प्रकरण काय आहे? याबाबत शहरात चर्चाना उधाण आले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment