‘त्या’ कोरोना मृतदेहा संदर्भात जिल्हा रुग्णालयाकडून स्पष्टीकरण  

Published on -

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- जिल्हा रुग्णालयात याबाबतीत हलगर्जीपणा झाला या आशयाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता असा हा व्हिडीओ होता.

परंतु या प्रकाराचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी सदर व्यक्तीवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा प्लास्टिकमध्ये ठेवणे, त्याचे सैनिटायझेशन करणे, अशा प्रक्रियेला किमान अर्धा तास तरी लागतो.

त्यापूर्वीच संबंधित व्यक्तीने व्हिडिओ काढला आहे असा दावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी केला आहे.

कोरोनामुळे दगावलेल्या रुग्णाचा मृतदेह चार तास दुसऱ्या एका रुग्णाशेजारीच केवळ चादरीने झाकून ठेवला होता़. हा धक्कायदायक प्रकार रविवारी (दि़१९) दुपारी उघडकीस आला़ होता.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe