‘येथील’ दगड खाणीतील स्फोटामुळे घरांना तडे

Published on -

अहमदनगर Live24 टीम,8 ऑगस्ट 2020 :- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गांतर्गत येणाऱ्या धोत्रे ते कोर्‍हाळे या 29.39 किलोमीटर रस्त्याचे काम सुरु आहे. या कामासाठी दगड व खडीची आवश्यकता असून त्यासाठी तळेगाव दिघे शिवारातील हसनाबाद

येथे दगड खाण व खडी क्रेशर प्रकल्प उभारण्यात आला आहे. या खाणीत मोठ-मोठे स्फोट केले जात असून या स्फोटामुळे स्थानिक रहिवाश्यांच्या घरांना हादरे बसून मोठे नुकसान होत आहे.

तरी सदर दगड खाण क्रेशर तात्काळ बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे

की, हसनाबाद येथील गट नंबर 313 व 314 मध्ये कंत्राटदार कंपनीने दगड खाण व खडी क्रेशरचा प्रकल्प उभा केला आहे. या ठिकाणी उत्खनन करताना मोठमोठे स्फोट केले जातात.

त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात असणाऱ्या घरांना मोठ्या प्रमाणावर हादरे बसत असून घरांच्या भिंतींना तडे जात आहेत. तसेच स्फोटादरम्यान बाहेर पडणारा विषारी वायू,

धूर, दगड व खडी क्रेशरमधून बाहेर पडणारी धूळ यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य व शेतपीक धोक्यात आले आहे. खाणीतील स्फोटादरम्यान मोठमोठे दगड उडून रहिवाशी वस्तीनजीक येऊन पडत असून

त्यातून स्थानिक रहिवाशांना गंभीर इजा तसेच जीवीतहानी होऊ शकते. खाणीतील विषारी वायू व धुळीमुळे स्थानिकांना गंभीर श्वसनाचे विकार जडू शकतात

तसेच त्यांच्या शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहेत. सदरच्या दगड खाणीतील बेकायदेशिर उत्खननाबाबत वेळीच दखल घेऊन कारवाई न झाल्यास दगडखाणीतून निर्माण होणार्‍या विषारी वायू,

धूळ, व धूर यामुळे भविष्यात जीवीतहानी देखील होऊ शकते. शेती नष्ट होऊ शकते, तरी सदर दगड खाण व खडी क्रेशर तात्काळ बंद करण्यात यावे,

तसेच स्थानिक रहिवाशांचे जे नुकसान झाले आहे, त्याची सदरील कंत्राटदार कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe