‘पीक विमा भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी’

Published on -

अहमदनगर Live24 टीम,2 ऑगस्ट 2020 :- सातत्याने पीक विमा भरुनही आणि नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याने नगर जिल्ह्यात यंदा पीक विमा भरण्याला आत्तापर्यंत फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 

त्यातच विमा भरण्यासाठी असलेले सर्व्हर डाऊन होत असल्याने वेळ वाया गेला आहे आणि आता शासनाने जाहीर केल्याप्रमाणे दि.31 जुलै 2020 ही अखेरची तारीख असताना

दोन दिवस अगोदर म्हणजे 29 जुलै मध्यरात्रीपासूनच राज्य शासनाने हे संकेतस्थळ बंद केल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहिले आहेत.

त्यामुळे पिकविमा योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी लाडजळगाव गटाच्या जि.प.सदस्या हर्षदा काकडे यांनी केली. त्या म्हणाल्या, कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

अशा परिस्थिती शेतकऱ्याने पिक विमा भरल्यास त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यास मदत होईल.

पीक विम्याची मुदतवाढ न दिल्यास शेतकऱ्यांचा होणाऱ्या नुकसानीस पीक विमा  कंपनीला जबाबदार धरण्यात येईल.

 

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News