‘आधी सुविधा द्या मग ऑनलाइन शिक्षण सुरू करा’

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत. परंतु विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याची सुविधा सुरु करण्याचे आदेश आल्यानंतर अनेक शाळांमधून ऑनलाईन शिक्षणास सुरुवात झाली.

मात्र, जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांची परिस्थिती लक्षात घेता आधी त्यांना मोबाइल्स, वीज आणि वायफाय देण्याची सुविधा सरकारने उपलब्ध करावी, मगच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे,

अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी केली आहे. राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, ज्यांना दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे, असे पालक साधा मोबाइल वापरू शकत नाहीत. त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाइल येणार कोठून? वाड्या-वस्त्यांवर राहणारे अनेक कुटुंबांकडे वीजच नाही.

अशा ठिकाणी दूरदर्शनवर किंवा ऑनलाइन अभ्यास करणे मुलांना शक्यच नाही. ऑनलाइन शिक्षणाची खरी वस्तुस्थिती संबंधित अधिकारी आपल्यापर्यंत येवू देत नाहीत, अशी शंकाही परजणे यांनी व्यक्त केली आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment