आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-आम्ही येणार, आम्ही येणार म्हणणारे फडणवीस आहेत. ते तसं म्हणतात पण येत नाहीत. त्यामुळे ते आशाळभूतपणे सत्तेकडे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे.

असा टोला महसूल मंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे. बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांनी राहुल गांधीवर केलेल्या वक्तव्यावर एक प्रतिक्रिया दिली. त्यावरुन त्यांना विचारलं असता त्यांनी शरद पवार हे ज्येष्ठ आहेत मात्र राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले अशी भावना व्यक्त केली.

मात्र याबाबत बोलत असतानाच त्यांनी फडणवीस यांच्यावरही टीका केली. आम्ही येणार म्हणणारे फडणवीस हे सत्तेकडे आशाळभूतपणे पाहात आहेत असं चित्र आम्हाला दिसतं आहे अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

आजच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली होती. कृषी कायद्यांबाबत काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांची भूमिका दुटप्पी आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

त्यावर प्रतिक्रिया विचारली असता बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. तसंच महाविकास आघाडीत कोणतीही धुसफूस, वाद नाहीत आमचं सरकार पाच वर्षे चालणार आहे, त्यापुढेही चालणार आहे असा विश्वासही व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment