अहमदनगर Live24 टीम,18 जुलै 2020 :-माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार करून ट्विट केल्याचे प्रकार हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी रचलेले षडयंत्र आहे,
असा आरोप भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला. माझ्या नावाने बनावट ट्विटर अकाउंट तयार केल्याचे माझ्या निदर्शनास आले असून त्याद्वारे मी कोणतीही पोस्ट टाकलेली नाही.

file photo
हे अकाउंट हे बनावट असून त्याबाबत मी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. या अकाउंटवरून ट्विट व रिट्विट केले. मला बदनाम करण्याच्या हेतूनेच हे केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]