रब्बी आला तरी महाआघाडी सरकारने ‘तो’ शब्द न पाळल्याने शेतकरी संतप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :-महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांना सरसकट दोन लाखांपर्यंत कर्जमाफी केली. परंतु त्यानंतर दोन लाखांच्यावर पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना मात्र, सरकारने वार्‍यावर सोडून दिल्याचे चित्र आहे.

त्यामुळे हे शेतकरी थकबाकीत गेले असून बँका दारात उभे करायला तयार नाहीत. त्यामुळे खरिपात देखील यांना नवीन कर्ज मिळालेले नाही. आता रब्बी तोंडावर आला आहे.

त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. आता तरी सरकारने दोन लाखांच्यावर कर्ज असणार्‍या कर्जखाती दोन लाखांची तातडीने कर्जमाफी द्यावी.

नाही तर खरिपाप्रमाणे रब्बी देखील वाया गेल्याशिवाय राहणार नाही व कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहणार नाही, अशी सूचक माहिती राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिली.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दोन लाखांच्यावर पीककर्ज असणार्‍या शेतकर्‍यांच्या कर्जखाती सरकार दोन लाख रुपये जमा करील व उर्वरित रक्कम त्या शेतकर्‍यांनी भरल्यानंतर त्याला महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळेल असे सांगितले होते.

परंतु या घोषणेला सहा महिने होऊन गेले. तरी या शेतकर्‍यांच्या कर्जखाती सरकारने काही जमा केले नाही, त्यावर व्याजाचा जास्तीचा भुर्दंड बसत असल्याने कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अशा शेतकर्‍यांची संख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment