अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :खतांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मोजक्या दुकानांत खत उपलब्ध असल्याने पहाटेपासून शेतकरी रांग लावतात.
सोशल डिस्टन्ससाठी जागा अपुरी पडत असल्याने आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतकी सहकारी संघ व श्रमिक कृषी सेवा केंद्र वगळता तालुक्यात कोणत्याच कृषी सेवा केंद्रावर खत उपलब्ध नाही.
याकडे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनही झाले. सर्वाधिक मागणी असलेले मीरा-७१ चढ्या भावाने विकले जात आहे.
कीटकनाशके व औषधांच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. डेलिगेटच्या १८० मिली बाटलीची किंमत सतराशे रुपये आहे. सामान्य शेतकऱ्यांना या किमती परवडत नाही. कोरोना संकटामुळे अनेक बाजार समित्या बंद आहेत.
भाजीपाल्याला भाव स्थिर नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोशल मीडियावरून शेतकऱ्यांनी खतांच्या तुटवड्यांचा निषेध व्यक्त करत दारु, तंबाखू, सिगारेटचा स्टॉक संपत नाही.
गुटखा बंदी असतांनाही सर्रास गुटखा उपलब्ध होतो, पण पेरणीच्या दिवसात खत-बियाणांचा स्टॉक कसा संपतो, असा सवाल उपस्थित केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews