कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील कर्जमाफी पासुन वंचित शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संजय मोकाटे व अमोल मोढे यांनी दिली.

भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना पाठोपाठ महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजना पासूनही तालुक्यातील सुमारे साडे आठशे शेतकरी वंचित रहिले आहेत.

याबाबत उपपुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची थेट भेट घेऊन याबाबत गाऱ्हाणे मांडणार आहे.

दोन्ही योजनेच्या लाभापासून राहुरी तालुक्‍यातील शेतकरी वंचित आहेत याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News