अहमदनगर लाईव्ह24 टीम :- राहुरी येथील धामोरी खुर्द येथील आदिवासी समाजाची स्मशान भूमीचे ट्रॅक्टरच्या साह्याने पूर्वजांचे कबरीचे उत्खनन करुन शेती प्लॉट तयार केला हरिजन समाजावर मोठा अन्याय केला याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना जालिंदर रघुनाथ पवार, भाऊसाहेब पवार, रमेश पवार, बाजीराव बर्डे, तानाजी पिंपळे, मल्हारी बर्डे, राजू बर्डे, अंकुश स्वपुत, राजू निकम आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
धामोरी खुर्द येथील हरिजन वस्तीची असलेली स्मशानभुमीवर ट्रॅक्टर व जेसीबी घालून उत्खनन करुन शेती प्लॉट तयार केला या उत्खननामध्ये जी मानवाची हाडे निघाली ती परस्पर फेकुन देऊन हरिजन समाजावर मोठा अन्याय केला व राहुरी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता पोलीस स्टेशन, महसुलाचे अधिकारी व तहसिलदार यांनी कुठलही कारवाई केली नाही म्हणून ऐनवेळी या ठिकाणी मोठा काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे दलीत समाजावर यापुर्वीही असेच प्रकारचे अन्याय झालेले आहे स्मशानभुमीत जेसीबी घालून बोगस शेती वाढविली आहे समाजाची स्मशानभुमी जेसीबी घालून शेती केलेली आहे.शेती काढणारे सुवर्ण समाजाचे असल्याने ते संपत्तीने परिपुर्ण असल्याने शासन दरबारी त्यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे ते वेळोवेळी दलीत समाजावर अन्याय करत आहेत. त्यात समाजाच्या स्मशान भुमीत अनेक लोकांनी अतिक्रमण करुन आजही त्यांनी जमीनीत शेती फुलविली आहे,
अश्या शासनाच्या जमीनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना शासनाने ग्रामपंचायत धामोरी खुर्द यांनी अतिक्रमण काढून घेण्यात यावे असे नोटीस देऊन ही कारवाई होत नसल्यामुळे. दलीत समाजावर मोठया प्रमाणावर अन्याय, अत्याचार होत असल्याचे निष्पन्न होते दलीत या समाजावर होणारा अन्याय, अत्याचार बंद करण्यात यावा व समाजाला न्याय मिळवून देण्यात यावा व दलीत समाजाला छळणा-या मच्छिंद्र दगडू सोनवणे,अशोक रुईचंद पारखे यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हरिजन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com