Ahmednagar News : शेतजमीन नावावर करून देत नसल्याच्या कारणावरून मुलाने आणि सुनेने वडिलांना शिवीगाळ करत लोखंडी गजाने मारहाण करत जमीन नावावर करून नाही दिली तर जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण परिसरातील निंबोडीवाडी येथे घडली.
याबाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात सोनाजी बापू जाधव, (वय ७०) यांच्या फिर्यादीवरून मुलावर आणि सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला. अशोक सोनाजी जाधव आणि सौ. उषा अशोक जाधव, दोन्ही रा. निंबोडीवाडी, मांडवगण, असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी यांच्या नावावर असलेली शेतजमीन नावावर करून घेण्यासाठी त्यांचा मुलगा अशोक सोनाजी जाधव आणि सून सौ. उषा अशोक जाधव यांनी दि. ६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ‘तुझ्या नावावरील जमीन, आमच्या नावावर करुन का देत नाही,
या कारणावरुन शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादी यांच्या मुलाने हातातील लोखंडी गजाने फिर्यादी यांच्या डाव्या हातावर व डाव्या पायाचे मांडीवर मारहाण केली.
तसेच शेती नावावर करून दिली नाही तर ‘तुला जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली. फिर्यादी हे या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर वडिलांनी मुलावर आणि सुनेवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल