Ahmednagar Accident : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील वडील ठार, मुलगा जखमी

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Accident

Ahmednagar Accident : राहुरी शहर हद्दीत नगर- मनमाड रस्त्यावर वडील व मुलगा मोटारसायकलवर कोल्हारकडून नगरकडे जात असताना मागून आलेल्या कंटेनरची त्यांना जोराची धडक बसली.

या घटनेत विजय शिरसाठ यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मुलगा किरकोळ जखमी झाला. ही घटना दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी घडली.

याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलेली माहिती अशी, की विजय द्वारकानाथ शिरसाठ (वय ३० वर्षे) व ओम विजय शिरसाठ (वय १२ वर्षे, रा. कोल्हार खुर्द, ता. राहुरी) हे दोघे वडिल व मुलगा काल शनिवार दि. २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर कोल्हार खुर्द येथून अहमदनगर येथे एका लग्न समारंभासाठी जात होते.

ते दोघे नगर मनमाड रस्त्याने जात असताना जोगेश्वरी आखाडा परिसरात त्यांच्या मोटारसायकलला एका कंटेनरची जोरात धडक बसली. यावेळी विजय शिरसाठ यांना गंभीर मार लागला होता. त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात नेत असताना मध्येच त्यांचा मृत्यू झाला.

या अपघातात विजय शिरसाठ यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला. विजय शिरसाठ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, वडील, दोन भाऊ असा परिवार असून त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe