भय इथे संपेना.. बिबटयाची दहशत कायम

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. प्राण्यांना भक्ष करणाऱ्या बिबट्याने मानवी वस्तीकडे आपली वाटचाल केली आहे. यातच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

नगर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. मेहकरी, ससेवाडी, जेऊर, गुंडेगाव, बाबुर्डी बेंद परिसरात अनेकांना बिबट्या दिसला. ससेवाडी भागात बिबट्याने काळविटाची शिकार केली. सुदैवाने कोणावरही बिबट्याने हल्ला केलेला नाही.

सध्या गहू, हरभरा, ज्वारी, मका या पिकांना पाण्याची नितांत गरज असून रात्रीच वीज रहात असल्याने शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. जीव मुठीत धरून शेतकरी शेती करत आहेत. बिबट्याची दहशत लक्षात घेता महावितरणने सध्यातरी दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांत जोर धरू लागली आहे.

ज्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन झाले, त्या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, शेतातील गहू, ज्वारी, हरभरा या उभ्या पिकांना पाणी देता येत नसल्याने नुकसान होणार आहे.

शेतकऱ्यांच्या सुरक्षेचे काय, असा सवाल यानिमित्त उपस्थित होत आहे. दरम्यान, सोलर प्रोजेक्टद्वारे शेतीपंपासाठी दिवसा वीज देण्यात येणार आहे. लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे महावितरणचे कार्यकारी अभियंता किसन कोपनर यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment