अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कुकाणे मध्ये खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद होऊ लागले आहेत. मटकाकिंग, जुगार चालवणारे, वाळूतस्कर भूमिगत झाले आहेत. आयपीएस अधिकारी प्रभारी म्हणून येताच ही किमया घडली.
कुकाणे, प्रवरासंगम ही मोठी पोलिस दूरक्षेत्रे आहेत. तालुक्यात अवैध धंदे फोफावले होते. अभिनव त्यागी यांनी कार्यभार हाती घेताच हे चित्र पालटले. त्यांची नियुक्ती होताच भल्याभल्यांचे धाबे दणाणले आहे.
उठसूट पोलिसांच्या कामांत हस्तक्षेप करणाऱ्यांनाही पायबंद बसला आहे. वाळूतस्करांनीही तालुक्यातून काढता पाय घेतला आहे. दरम्यान, त्यागी यांची नियुक्ती तीन महिन्यांसाठीच आहे.
त्यांना वर्षभरासाठी तरी ठेवावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना पोलिस अधीक्षकांना प्रत्यक्ष भेटून करणार आहेत, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्य अपूर्वा गर्जे यांनी दिली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved