हत्याराचा धाक दाखवत वाहनचालकास लुटले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-कोपरगाव शहरात चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी वाहन चालकास लुटल्याचा प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील भाजी मार्केट परिसरात हत्याराचा धाक दाखवत एका वाहनचालकास लुटले.

यामध्ये त्याच्याजवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व २०० रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. ही घटना बुधवारी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी दीपक कचरू औताडे याने गुरुवारी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेने शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यामध्ये चोरी, लुटमार, घरफोडी अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने घडत असल्याने प्रशासनाचा वचक दिसून येत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment