अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :- मागील महिन्यापासून सातत्याने होणारी कोरोना रुग्ण वाढ चिंता वाढवणारी असल्याने ही साखळी तोडण्यासाठी शनिवारी १५ मे पासून नेवासा शहरात पंधरा दिवसांचा जनता कफ्र्युस प्रारंभ करण्यात आला.
जनता कफ्र्युच्या पहिल्याच दिवशी नागरिकांसह व्यापाऱ्यांनी सर्व दुकाने बंद ठेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनता कफ्र्युमध्ये मोकाट फिरणाऱ्यांची यावेळी अँटीजेन टेस्ट करण्यात आली.दि.१५ मे पासून ३० मे असा पंधरा दिवसांचा जनता कफ्र्यु शनिवारी सुरु झाला.

यावेळी नगरपंचायत चौकात टेबल मांडण्यात आला होता.काही कारण नसतांना मोकाटपणे फिरणाऱ्यांला ताब्यात घेऊन त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली.लॅब टेक्निशियन कृष्णा कोकणे यांनी टेस्ट कामी सहकार्य केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान,सतीश पिंपळे, नगरपंचायतचे अधिकारी रविंद्रकुमार गुप्ता यांच्यासह नगरसेवकांनी शहरातील मुख्य रस्त्यांवर फिरून ओटयावर व नाहक रस्त्यांवर फिरणाऱ्यांना घरी रहाण्याची सक्त ताकीद दिली.
यावेळी काढण्यात आलेल्या आवाहन फेरीत माजी सरपंच सतीश गायके, नगरसेवक रणजित सोनवणे, संदीप बेहळे, दिनेश व्यवहारे, सचिन वडागळे, राजेंद्र मापारी, पोलीस स्टेशनचे बुचकूल, पो. कॉ.राजू काळे, पोलीस मित्र संघटनेचे स्वयंसेवक होमगार्ड जवान सहभागी झाले होते.
सर्वांच्या हितासाठी घरात राहून जनता कफ्र्युला पाठिंबा द्या,या आवाहनाला पहिल्याच दिवशी नेवासकरांनी प्रतिसाद दिला. अशीच साथ राहू द्या असे आवाहन सुखदान यांनी केले. गावाच्या हिताच्या दृष्टीने नागरिक व व्यापाऱ्यांनी जनता कफ्र्युला सहकार्य करावे, असे आवाहन पिंपळे यांनी यावेळी बोलताना केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम