जमिनीच्या वादातून देवराईत दोन गटांत हाणामारी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील देवराई येथे जमिनीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, देवराई येथील पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.३०जानेवारी रोजी मी किराणा दुकानातून घराकडे जात असताना खंडोबा मंदिरासमोर मला पाहून आरोपींनी शिवीगाळ करून तुम्ही आमच्या पॅनलचे उमेदवार पडले आहेत.

असे म्हणत गज व लाकडी दांडक्याने मला मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तर दुसऱ्या गटाच्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, आरोपींनी आमच्या घरात येऊन गज व लाकडी काठीने मारहाण करत तू आम्हाला जमीन देणार आहेस का नाही असे म्हणत मारहाण केली.

माझ्या वडिलोपार्जित जमीन आहे मी ती देणार नाही असे म्हणताच या सर्वांना राग येऊन त्यांनी मला जबर मारहाण केली. जर जमीन नाही दिली तर तुला व तुझ्या पतीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या संपूर्ण प्रकाराचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बर्डे हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News