कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी तसेच आपला आवाज शासन दरबारी पोहचण्यासाठी आंदोलन हे एकमेव हत्यार आहे.

याचा अवलंब करूनच आपले प्रश्न सोडविले जाऊ शकतात यासाठी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला जातो. असाच काहीसा प्रकार राहुरी मध्ये घडला आहे. मात्र अद्यापही या व्यक्तीला न्याय मिळाला नाहीये.

कुटुंबातील व्यक्तींना शिवीगाळ, मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या गुंडांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी राहुरी येथील गोरक्षनाथ मेहेत्रे यांनी २७ नोव्हेंबरपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.

मेहेत्रे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले, राहुरी शहर हद्दीतील सर्व्हे नंबर ४ व सर्व्हे नंबर ७०७ मधील जागेचा राहुरी येथील न्यायालयात दावा चालू असताना दावा मागे घेण्यासाठी १५ नोव्हेंबरला भाडोत्री गुंडाकडून गावठी कट्ट्याद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या पाठोपाठ २३ नोव्हेंबरला गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी माझी पत्नी व मुलीबरोबर असभ्य गैरवर्तन करून मला व माझ्या कुटुंबाला शिवीगाळ व मारहाण करत वादग्रस्त जागेत जेसीबी मशीनच्या साहाय्याने खड्डे खोदले. यावेळी राहुरी येथील भूमी अभिलेख कार्यालयातील तसेच काही पोलिस कर्मचारी देखील उपस्थित होते.

या सर्वांच्या समक्ष माझ्या कुटुंबावर अत्याचार करण्यात आल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. संबंधित गुंडांनी माझ्या घरासमोरील पिकाचे नुकसान केले. मारहाण करणाऱ्या गुंडांवर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार करावे, अशी मागणी गोरक्षनाथ मेहेत्रे यांनी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News