अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- जमीन खरेदीत डॉक्टरची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील पाच जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाने संगमनेर शहरात मोठी खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा होत आहे.
नवीन नगर रोड येथील गंगागिरी सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. योगेश बाळकृष्ण गेठे यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये गुंजाळवाडीतील गट नंबर ४५ मधील १० गुंठे जागा खरेदी केली.
या व्यवहारात डॉ. गेठे यांनी दोन टप्प्यांत ४० लाख रुपये दिले. मात्र, जागा मालकांनी त्यांना कुठलाही व्यवहार पूर्ण करून दिला नाही. कागदपत्रेही दिली नाहीत. त्यामुळे डॉ. गेठे यांनी व्यवहार रद्द करत पैसे परत देण्यासाठी तगादा लावला.
जमीन मालकांनी ९ धनादेश दिले, मात्र ते वटले नाहीत. डॉक्टरांनी न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु जागा मालक पैसे देण्यास तयार नव्हते. त्यांना दमदाटी करुन पळवून लावले.
अखेर डॉक्टरांनी शहर पोलिस ठाणे गाठले. डॉ. गेठे यांच्या फिर्यादीवरुन प्रशांत झावरे, वनिता झावरे, प्रवीण झावरे, प्रकाश झावरे, शारदा झावरे (घोडेकर मळा) या पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved