तरुणीचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- एकतर्फी प्रेमातून तरूणाने तरूणीचा गळा आवळल्याची धक्कादायक घटना गुरूवारी पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा औदयोगिक वसाहत परिसरात घडली.

याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रविण भिमाजी गवळी (रा. राजापूर मठ ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक नितिनकुमार गोेकावे यांनी दिली.

यासंदर्भात पिडीत तरूणीने पोलिसांना सुप्यातील खाजगी रूग्णालयातून उपचारादरम्यान दिलेल्या जबाबवरून आरोपी गवळी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरूणीच्या गळयाभोवती दोरीने आवळल्याचे व्रण आढळून आल्याने शिवाय वैद्यकिय अहवालातही गळा आवळल्याचे स्पष्टपणे नमुद करण्यात आल्याने गवळी याने तरूणीस जिवे मारण्याचाच प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

गुरूवारी जबाबानंतर उशिरा गवळी याच्याविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेनंतर आरापी गवळी हा पसार झाला असून सुपे पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या पीडित तरुणी ही म्हसणे फाटा येथे असलेल्या एका कंपनीमध्ये कामाला आहे. तिच्या गावा शेजारचा एक तरुण तिच्याच कंपनीमध्ये नोकरीस आहे.

तो तिच्याकडे नेहमीच प्रेमाची भावना व्यक्त करीत होता. मात्र, तरुणीकडून प्रतिसाद मिळत नव्हता. दरम्यान, गुरूवारी पहाटे पीडित तरुणी कंपनीमध्ये जाण्यासाठी निघाली असता तरुणाने तिला वाटेत अडविले.

त्यानंतर पाठीमागून तिचा गळा आवळला. ती बेशुद्ध अवस्थेत गेल्यानंतर त्याने तिला रस्त्याच्याकडेला फेकून दिले. त्यानंतर ती अत्यावस्थेत सापडली असून खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment