बाजार भरवल्याप्रकरणी माजी सभापती सह ‘त्यांच्यावर’ गुन्हा दाखल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग करुन पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमा करून जनावरांचा बाजार भरवल्याप्रकरणी बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक नानासाहेब पवार,

टाकळीभानच्या सरपंच रूपाली धुमाळ, पवार (पूर्ण नाव माहीत नाही) व इतर २ ते ३ नावे माहीत नसलेल्या व्यक्तींवर श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस नाईक विशाल रामराव हापसे यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. रविवार, २७ जुलै रोजी खिर्डी रोडवरील आठवडे बाजारच्या जागेवर सकाळी १०.३० ते १२.३० या वेळेत लोकांना प्रोत्साहन देऊन

सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ति एकत्रित येण्यास मनाई आसताना देखील जनावरांचा अवैध बाजार भरवून जिल्हाधिकारी अहमदनगर

यांच्या आदेशाचे आल्लंघन केल्याप्रकरणी सरकारतर्फे वरील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, टाकळीभान येथे रविवारी बाजारतळावर जनावरांची शेतकरी ते शेतकरी खरेदी विक्री सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आले.

या सुविधा केंद्रात अनेक शेतकऱ्यांनी गायी, म्हशी, शेळ्या व कोंबड्या विक्रीसाठी आणल्या. त्यामुळे खरेदी-विक्रीसाठी केंद्रावर मोठी गर्दी होऊन फिजिकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला होता.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment