माजी आमदाराच्या मुलीविरोधात गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :- तू अविनाश आदिक आणि अनुराधा आदीक यांच्यासोबत का राहतो, नगरपालिका तुझ्या बापाची आहे का ?

अशी मोबाईलवरून दमबाजी करत व्हाट्सअपवर जातीवाचक उच्चर करून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची कन्या शिल्पा मुरकुटे यांच्या विरोधात एकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत अल्तमश अन्सार पटेल(वय-२९) यांनी म्हंटले की,७ फेब्रुवारी पासून ते १४ एप्रिल दरम्यान शिल्पा भानुदास मुरकुटे यांनी मला फोन करून तू अविनाश आदिक आणि अनुराधा आदिक सोबत का राहतो?

नगरपालिका तुझ्या बापाची आहे का? असे म्हणून शिवीगाळ करत माझ्या व्हाट्स अँपवर जातीवाचक शब्द वापरून जीवे मारण्याची धमकी दिली.

अल्तमश अन्सार पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिल्पा भानुदास मुरकुटे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची श्रीरामपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

घटनेचा आधिक तपास पोसई समाधान सुरवाडे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe