Ahmednagar News : अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद ! काही भागात चिमुकल्यांचाही गेलाय बळी

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. लोणी परिसरात तर बिबट्याने दोन जणांचा जीव घेतला. त्यामुळे या पट्ट्यात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे.

सायंकाळी सहा नंतर एकट्याने बाहेर फिरणेही जिकरीचे होऊन बसलेले आहे. दम्यान नुकतेच देवळाली बंगला शिवारात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. येथील नागरिकांसह शेतकऱ्यांत चांगलीच दहशत पसरलेली होती. अखेर येथील बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागास यश आले आहे.

देवळाली बंगला परिसरातील डावखर वस्ती परिसरात असलेल्या धनराज कदम यांच्या शेतात वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी शुक्रवारी दुपारी लावलेल्या पिंजऱ्यात शनिवारी पहाटे हा बिबट्या अडकला.

सकाळी परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना लक्षात येताच त्यांनी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांसह अनेकांनी या बिबट्या मादीला ताब्यात घेऊन बारागाव नांदूर रोपवाटिका येथे नेण्यात आले.

दरम्यान, घटनास्थळी माजी आमदार चंद्रशेखर कदम व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी धाव घेऊन वन विभाग व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. ज्या भागात सातत्याने बिबट्याचे दर्शन होते, त्या ठिकाणी पिंजरे लावण्याबाबत सूचना केल्या.

मागील महिन्यात लोणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरली. देवळाली प्रवरा भागात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत झाले असून

नागरिकांनी सायंकाळी ६ नंतर लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, जनावरांसाठी बंदिस्त गोठे करावे, घराजवळ लाईट व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe